सुधारणावादी - Reformist

सुधारणावादी  - Reformist शिकलेल्या माणसांनी आत्मसन्मानाने जग?

06/09/2018

निसर्गनियमाच्या विपरीत केलेली प्रत्येक क्रूती ही निंदणीयच आहे.

30/06/2016

तू 'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'दूत' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण
मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !
तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !
चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !
देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?
ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?
चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?
असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !
देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !
म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !
अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !

30/04/2016

हे काय चाललयं? ...
मेडीकल किंवा इंजीनियरींगला प्रवेश घेणे हे स्वप्न मुलं आणि पालक 10-10वर्षे बघत असतात.त्याची त्याप्रमाणे तयारी करतात.त्यानुसार 11 वी व 12वी ला कॉलेज निवडतात.दोन वर्षे अहोरात्र मेहनत घेतात.आणि परीक्षेपुर्वी दोन दिवस अगोदर कोणीतरी तुमच्या 10 वर्षांच्या स्वप्नांवर व दोन वर्षांच्या मेहनतीवर पोथेरा फीरवला तर ?...कल्पनाच करवत नाही.
या विषयावर विचार करताना पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे इतका हट्टहास कशासाठी ? मुलांची 2 वर्षांची मेहनत वाया जाण्याला आणि त्यामुले आयुष्याची दिशा बदलण्याला कोण जबाबदार आहे?कोण भरुन देणार हे नुकसान?आणि सर्वात महत्वाचे म्हणजे का खेल मांडलाय?
हा विषय आजचा नाही.मागील 5 वर्षांपासुन हा खो-खो चालुयं.ज्यांना आमच्यावतीने निर्णय घेण्यास प्राधिकृत केले ना त्यांना आमची फीकीर ना आमच्या जिंदगीवर परीनाम करण्याचा निर्णय देणा-यांना.एकदा कोणताही झालेला निर्णय कमीतकमी 2वर्षांसाठी तरी का कायम ठेवत नाहीत ? काल दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 2017 पासून करावी असा निर्णय करता आला नसता काय ? एवढी घाई कोणासाठी ?ह्या निर्णयामुले कोणाचे भले होणार आहे?आणि महाराष्र्टाचीच CET घेणार हा हटटाहास तरी कशासाठी ?ज्यांना ज्यांना अधिकार दिले त्या सर्वांनी मीलून लोकांच्या जिंदगीचा खेल चालवलाय.

09/04/2016

स्त्री असल्याने मागील ४०० वर्षा पासूनच्या अन्यायातुन स्त्रीला मुक्त केल्याबद्दल व सन्मानीत केल्याबद्दल भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व टिम आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अभिनंदन.उर्वरीत ठिकाणी सुरु असणारा अन्याय ही लवकरच दुर व्हावा यासाठी सदिच्छा.

23/03/2016

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजुए कातिल में है ।
तरुणांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारे व त्यांच्या गोष्टी आजही ऐकल्या कि मनात एक नव चैतन्य येणारे असे आपले स्वातंत्र्य वीर भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांचा २३ मार्च ला बलिदान दिवस आहे. त्यांना विनम्र अभिवादन.....!

01/03/2016
16/01/2016

स्वराज्याचे दुसरे छञपतीं संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या (16 जानेवारी1681)
शुभेच्छा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

16/01/2016

No one saves us but ourselves. No one can and no one may. We ourselves must walk the path.
- Buddha

12/01/2016

जिजाऊ आऊसाहेबांना जन्मदिनानिमीत्त अभिवादन.

04/01/2016

Night will change into day without any effort on your part. But that’s just about all the help you will get from Mother Nature. To succeed, your efforts start now. Good morning.

03/01/2016

घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?

कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ

27/12/2015

जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही धर्मातला कोणताही माणूस जेव्हा आपण त्या धर्मातले कट्टर आहोत म्हणून सांगतो तेव्हा तो त्या धर्मातला प्रचंड बोगस माणूस असतो. आपला खरा धर्म सांगणारी माणसं आपण कट्टर धर्मवादी आहोत असं कधीच सांगत नाहीत. त़ी आपला धर्म निमुटपणे मानतात आणि दुस-याला आपल्या धर्माचा आदर वाटावा अशा पध्दतीने तो अंमलात आणतात. कोणत्याही धर्माच्या आधारे माणूस जितका जास्त धार्मिक होतो तितका तो जास्त ढोंगी असतो हा गुरूत्वाकर्षणाइतकाच साधा नियम आहे!!
-नेल्सन मंडेला

Address

Karamala
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुधारणावादी - Reformist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share