11/03/2024
*मुंबई महानगर पालिकेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे भव्य दिव्य आयोजन*
मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती, मुंबई आयोजित गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे आयोजन *शनिवार दि. १६ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वा.* स्थळ : *शारदा मंगल कार्यालय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई - ४०००१६* येथे करण्यात आले आहे.
सदर जयंतीचे हे ८ वे वर्षे असून कोरोना काळात जयंती साजरी न झाल्याने महापालिकेने देण्यात येणारे रू. ५ लाखाचे अनुदान रद्द केले होते. मुंबईच्या माजी महापौर व संत रोहिदास जयंती महापालिकेतर्फे साजरी व्हावी म्हणून धाडसी निर्णय घेणाऱ्या *सौ. स्नेहलताई आंबेकर* यांनी अथक प्रयत्न व सतत पाठपुरावा करून यंदा रू. २० लाखाचे अनुदान मंजूर करून घेतले, त्याबद्दल समाजातर्फे त्यांचे अभिनंदन ! मात्र या अनुदानातून १ रुपया देखील समन्वय समितीच्या हातात किंवा खात्यात जमा होत नसतो. आम्ही त्या जयंतीचे फक्त नियोजन करत असतो. संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे अध्यक्ष *मा. श्री. सूर्यकांत आंबेकर* यांनी प्रचंड मेहनत घेऊन कमी वेळेत जयंतीच्या प्रत्येक कामाचे (निमंत्रण पत्रिका, जाहिरात, बॅनर, ट्रॉफी व स्मरणिका छपाई ई.) नियोजन केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन !
सदर जयंतीचे उद्घाटक माजी समाजकल्याण मंत्री *मा. श्री. बबनराव (नाना) घोलप* असून स्वागताध्यक्ष *सौ. स्नेहल आंबेकर* आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महापालिका आयुक्त *श्री. इकबाल सिंह चहल* तसेच इतर मान्यवरांमध्ये खासदार *अरविंद सावंत, राहुल शेवाळे* व आमदार *कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर*, माजी गृहराज्यमंत्री *मा. श्री. बाळा नांदगावकर*, माजी आमदार *बाबुराव माने,* माजी महापौर *महादेव देवळे*, मा. प्रभाग समिती अध्यक्ष *मनोज जामसुतकर*, रोहिदास समाज पंचायत अध्यक्ष *मयूर देवळेकर*, मनपा उपायुक्त *श्री. प्रशांत सपकाळे*, एफ साऊथ मनपा सहा. आयुक्त *महेश पाटील* आणि इतर चर्मकार समाज नेते उपस्थित राहणार आहेत.
तसेच या प्रसंगी खालील मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
*संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार - २०२४*
१) मा. श्री. गणेश पांडुरंग खेडेकर
२) मा. श्री. चंद्रकिरण आत्माराम यादव
३) मा. श्री. दादासाहेब (अशोक) शिंदे
४) मा.श्री. अर्जुन यशवंत घायाळे
५) मा. श्री. राजू लक्ष्मण नेटके
*संत रोहिदास विशेष कार्य सन्मान पुरस्कार - २०२४*
1) मा. श्री. सुधाकर शिरसाट
2) मा. श्री. सुनील बंडू सातपुते
3) मा. श्री. राजेश शांताराम मासवकर
4) मा. श्री. अशोकराव कोंडिराम माने
5) मा. सौ. रोहिणी राम कदम
6) मा. श्री. राजेंद्र भागोजी जळगावकर
7) मा. श्री. प्रमोद किसन चिपळूणकर
8) मा. श्री. धर्मराज कालुराम मौर्य
9) मा. श्री. देवदास शिवा सावर्डेकर
10) मा. श्री. सुरेश मारुती अभंग
तरी मी या पोस्टद्वारे सर्व समाजबांधवांना जाहीर आमंत्रित करीत आहे. कृपया हेच निमंत्रण समजून संत रोहिदास महाराज जयंती करीता न चुकता उपस्थित रहावे, ही नम्र विनंती !
धन्यवाद,
आपला नम्र,
संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती करीता,
*डॉ. शांताराम पां. कारंडे*
सरचिटणीस