Home Chef Shree

Home Chef Shree Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Home Chef Shree, Bangalore.

Marathi Food Creator
पारंपरिक + हेल्दी ट्विस्ट
मराठी स्वयंपाकाची खरी चव ✨
Healthy Marathi Recipes | Weight Loss Friendly
Consistency | Discipline | Clean Eating
Let’s build a Strong Healthy Community 💚
DM for Collab

आरोग्यदायी खाणं म्हणजे चवीला तडजोड नाही! 🌿✨नाश्त्यासाठी बनवली मऊ, हलकी आणि पौष्टिक बाजरीची इडली 😍डायबिटीज, weight loss आ...
18/05/2026

आरोग्यदायी खाणं म्हणजे चवीला तडजोड नाही! 🌿✨
नाश्त्यासाठी बनवली मऊ, हलकी आणि पौष्टिक बाजरीची इडली 😍
डायबिटीज, weight loss आणि healthy lifestyle साठी एकदम perfect पर्याय 💚
एकदा नक्की करून बघा… घरच्यांनाही खूप आवडेल! 😋


👉 साहित्य:
• 1 कप बाजरी
• ⁠1/2 कप इडली राइस
• 1/2 कप उडीद डाळ
• 1 चमचा मेथी दाणे
• चवीनुसार मीठ
• पाणी आवश्यकतेनुसार

👉 कृती:
1️⃣ बाजरी , इडली rice, उडीद डाळ स्वच्छ धुऊन त्यात मेथी दाणे घालून 6-8 तास भिजत ठेवा.
2️⃣मग सगळे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
3️⃣ रात्रभर किंवा ८ तास फरमेंट करायला ठेवा.
4️⃣ ✨ सकाळी batter छान फुगलेलं दिसेल.
5️⃣त्यात चवीपुरते मीठ घालून मिक्स करा
6️⃣ इडलीच्या साच्याला हलकं तेल लावा.
7️⃣ batter घालून 10-15 मिनिटे steam करा.
8️⃣ गरमागरम मऊ बाजरीच्या इडल्या तयार 😍

🥥 नारळाची चटणी आणि सांबारसोबत serve करा.

ही हेल्दी बाजरी इडली recipe आवडली तर save आणि share नक्की करा ❤️

#बाजरी #इडली ゚viralシ

पुण्याच्या गार हवेत, family आणि friends सोबत घालवलेले काही क्षण मनाला कायमचे आठवणीत राहतात… आणि त्यात जर हातात chilled “...
17/05/2026

पुण्याच्या गार हवेत, family आणि friends सोबत घालवलेले काही क्षण मनाला कायमचे आठवणीत राहतात… आणि त्यात जर हातात chilled “Hapus Mango Milkshake” असेल, तर त्या क्षणांची मजाच काही वेगळी असते! 🥭✨

गोड, रसाळ हापूस आंब्याचा सुगंध… वरून creamy milkshake, fresh mango pieces, dry fruits आणि हलकीशी malai — प्रत्येक sip आणि प्रत्येक bite म्हणजे उन्हाळ्याचा खरा आनंद! 🍹💛
पुण्याच्या शांत रस्त्यांवर, संध्याकाळच्या गार वाऱ्यात सगळे एकत्र बसून गप्पा मारत हा milkshake enjoy करणं म्हणजे छोटंसं happiness therapyच वाटलं.

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात असे moments खूप special असतात. ना कोणती घाई, ना tension… फक्त आपली माणसं, भरपूर हशा आणि आंब्याची गोड चव! 😍
एका glass मध्ये इतका आनंद मिळू शकतो, हे त्या दिवशी पुन्हा जाणवलं.

हापूस mango milkshake फक्त एक drink नाही, तर आठवणींना गोडवा देणारा अनुभव आहे. 🥭
Friends सोबतचे jokes, family सोबतचे bonding moments आणि त्या सुंदर पुणेरी vibe मुळे हा दिवस अजून खास बनला.

“Good food + Favorite people = Beautiful memories” ❤️

पुण्यातील हे छोटे छोटे क्षण आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवावे असेच… ✨🥭

16/05/2026

Missing Link… पण Traffic Same?
Mumbai-Pune आता Fast… पण Worth It? 🚘 हे पाहिल्यावर Long Drive ला जायची इच्छा होईल ❤️ इतका सुंदर रोड India मध्ये? 😮✨
Mumbai-Pune Expressway चा गेमच बदलला 🔥
घाट संपला… आता फक्त Smooth Ride 😍
MUMBAI-PUNE FASTEST ROUTE ⚡

Protein + Taste + Health 😍 एका थालीपीठात सगळं काही मिळालं तर? 🌿सोयाबीन थालीपीठची मजाच काही वेगळी 😍सोया चंक्स थालीपीठ — ह...
15/05/2026

Protein + Taste + Health 😍
एका थालीपीठात सगळं काही मिळालं तर? 🌿

सोयाबीन थालीपीठची मजाच काही वेगळी 😍

सोया चंक्स थालीपीठ — हेल्दी ब्रेकफास्ट किंवा डिनरसाठी परफेक्ट!

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल 😍

🫓 सोया चंक्स थालीपीठ

📝 साहित्य:

* 1 कप सोया चंक्स
* ⁠1 टोमेटो 🍅
* 1 कप ज्वारी पीठ
* 1/2 कप बेसन
* 1 बारीक चिरलेला कांदा
* 1 बारीक किसलेला गाजर
* 2-3 टेबलस्पून कोथिंबीर
* 1-2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
* 1 टीस्पून लाल मिरची पावडर
* ½ टीस्पून हळद
* 1 टीस्पून जिरे पावडर
* मीठ चवीनुसार
* पाणी (पीठ मळण्यासाठी)
* तेल भाजण्यासाठी

👩‍🍳 कृती:

1. सोया चंक्स आणि एक टोमेटो गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजवून घ्या. (gas बंद करून)
2. थंड झाल्यावर पाणी काढून चंक्स चांगले पिळून मिक्सरमध्ये टोमेटो सोबत बारीक वाटून घ्या.
3. एका भांड्यात वाटलेले सोया चंक्स, ज्वारी पीठ, बेसन एकत्र करा.
4. त्यात कांदा, गाजर, कोथिंबीर, मिरच्या घाला.
5. मसाले आणि मीठ घालून सगळं छान मिक्स करा.
6. पाणी न घालता चांगले मिक्स करून थालीपीठाचं पीठ मळून घ्या.
7. तव्यावर तेल लावून हाताने किंवा प्लास्टिक पेपर वर थालीपीठ थापा.
8. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घ्या.

😋 सर्व्हिंग:

लोणी, दही किंवा हिरवी चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
💡 टिप्स:

* अधिक प्रोटीनसाठी थोडं ओट्स पीठही घालू शकता
* कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी तव्यावर थोडं जास्त तेल लावा
* लहान छिद्र करून तेल सोडलं तर थालीपीठ छान भाजतं

📌 Recipe आताच Save करा आणि नक्की ट्राय करा!

#थालीपीठ

पहाटेची वेळ… अजून सूर्य पूर्णपणे उगवलेला नसतो, पण भाजी बाजार मात्र आधीच जागा झालेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रंग...
14/05/2026

पहाटेची वेळ… अजून सूर्य पूर्णपणे उगवलेला नसतो, पण भाजी बाजार मात्र आधीच जागा झालेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रंगीबेरंगी भाज्यांचे ढीग मांडलेले असतात. कुठे हिरवीगार कोथिंबीर, कुठे ताज्या टोमॅटोचा लालसरपणा, तर कुठे वांग्यांची चमक — सगळीकडे एक वेगळंच सौंदर्य पसरलेलं असतं.

भाजी विकणाऱ्या बायांच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा असते —
“ताजी मेथी घ्या हो…!”
“तीस रुपयात दोन जुड्या…!”
त्या आवाजांमध्ये फक्त व्यापार नसतो, तर रोजच्या जगण्याची धडपड दडलेली असते.

एका कोपऱ्यात एक वृद्ध आजोबा शांतपणे पालकाच्या जुड्या बांधत बसलेले असतात. त्यांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये वर्षानुवर्षांचा अनुभव दिसत असतो. तर दुसरीकडे एक छोटी मुलगी आईजवळ बसून ग्राहकांना पिशव्या देत असते. तिच्या चेहऱ्यावर थकवा असतो, पण डोळ्यांत स्वप्नंही असतात.

भाजी बाजार म्हणजे फक्त खरेदी-विक्रीची जागा नाही… तो मेहनतीचा, आशेचा आणि माणुसकीचा जिवंत आरसा असतो. प्रत्येक भाजीमागे एखाद्या शेतकऱ्याचा घाम असतो, प्रत्येक आवाजामागे एका कुटुंबाची जबाबदारी असते.

पावसाळ्यात चिखलात उभं राहूनही हे लोक हसत काम करताना दिसतात. उन्हाळ्यात घामाने अंग ओलं होतं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर “आजचा दिवस चांगला जावो” ही आशा कायम असते. त्यांच्याकडे पाहिलं की समजतं — जीवन कितीही कठीण असलं, तरी मेहनत आणि सकारात्मकता माणसाला पुढे नेत असते.

भाजी बाजारात फिरताना एक गोष्ट नक्की जाणवते — इथे प्रत्येक रंग बोलतो, प्रत्येक चेहरा एक कथा सांगतो आणि प्रत्येक सकाळ नवी प्रेरणा देऊन जाते.

कधी कधी मोठ्या मॉलपेक्षा हा साधा बाजार जास्त श्रीमंत वाटतो… कारण इथे पैशांपेक्षा जास्त माणुसकी मिळते..

#बाज़ार #सब्जिमंडई

Cooking म्हणजे माझ्यासाठी Therapy❤️🍲काही लोकांना शांतता पुस्तकांमध्ये सापडते…काहींना प्रवासात…आणि मला?मला शांतता स्वयंपा...
13/05/2026

Cooking म्हणजे माझ्यासाठी Therapy❤️🍲

काही लोकांना शांतता पुस्तकांमध्ये सापडते…काहींना प्रवासात…आणि मला?मला शांतता स्वयंपाकात सापडते.

हो… Cooking म्हणजे माझ्यासाठी फक्त रोजचं काम नाही, तर एक Therapy आहे.

जेव्हा मी kitchen मध्ये जाते, तेव्हा बाहेरच्या जगाचा गोंधळ हळूहळू कमी व्हायला लागतो. भाज्या चिरताना, फोडणीचा सुगंध दरवळताना, पोळ्या फुगताना… मन नकळत शांत होतं. प्रत्येक पदार्थासोबत मी माझ्या भावना मिसळत असते.

कधी mood खराब असतो…कधी मन थकल्यासारखं वाटतं…पण एखादा नवीन पदार्थ बनवायला घेतला की मन पुन्हा fresh होतं.

Cooking मला patience शिकवतं.एका batter ला ferment व्हायला वेळ लागतो…तसंच आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींनाही वेळ लागतो, हे kitchen नेच शिकवलं.

स्वयंपाक करताना मला जाणवतं — perfection पेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं. कारण एखादा पदार्थ थोडा कमी-जास्त झाला तरी घरचे प्रेमाने खातात… आणि तेच खरं समाधान असतं.

Cooking म्हणजे फक्त recipe follow करणं नाही…तर आठवणी तयार करणं आहे.

आईच्या हातचा वरणभात, आजीची चटणी, पावसाळ्यातले भजी, रविवारचा डोसा… हे पदार्थ फक्त चव नाहीत, तर भावना आहेत.

कधी कधी वाटतं — kitchen ही माझी happy place आहे.जिथे मी स्वतःला विसरते… आणि पुन्हा स्वतःलाच शोधते.

एका साध्या फोडणीतही आनंद असतो,
गरम चपातीत काळजी असते,
आणि गोड पदार्थात प्रेम दडलं असतं.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोक stress कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. पण माझ्यासाठी…
एक कप चहा बनवणं,
गरम पोळ्यांवर तूप लावणं,
किंवा नवीन recipe try करणं…
हेच meditation आहे.

Cooking मला रोज नव्याने जगायला शिकवतं.
म्हणूनच…

माझ्यासाठी Cooking म्हणजे फक्त स्वयंपाक नाही…
ती मनाला शांत करणारी Therapy आहे. ❤️

© HomeChefShree

12/05/2026

समुद्री मेथी ची साधी पण मन जिंकणारी भाजी ❤️ भाकरीसोबत एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल 🫰🌿

🌿 समुद्री मेथीचे फायदे:

✅ 1. पचनासाठी चांगली

समुद्री मेथीत फायबर भरपूर असते त्यामुळे पचन सुधारायला मदत होते.

✅ 2. Weight loss साठी उपयोगी

कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं 😍

✅ 3. Diabetes मध्ये फायदेशीर

मेथीमध्ये नैसर्गिकरित्या blood sugar control करण्याचे गुण असतात.

✅ 4. Iron आणि Calcium चा चांगला स्रोत

शरीराला ताकद मिळते आणि हाडांसाठीही चांगली 🌿

✅ 5. Immunity वाढवायला मदत

यात antioxidants आणि vitamins असल्यामुळे शरीरासाठी पौष्टिक मानली जाते ❤️

゚viralシ

11/05/2026

🌿 मऊसूत, हेल्दी आणि पोटभर बाजरीची इडली 😍
डायबिटीज, weight loss आणि healthy breakfast साठी एकदम perfect! ✨
゚viralシ

08/05/2026

Healthy, tasty आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेले जाळीदार dose 🥰
゚viralシ

07/05/2026

कुरकुरीत Crispy भेंडी फक्त ५ मिनिटात तयार 😍🫰
#भिंडी ゚viralシ

06/05/2026

वजन लवकर कमी करण्यासाठी आहारात हे खा
Protein + Fiber ने भरलेलं perfect Recipe For Weightloss and diabetes

Detail Recipe 1st comment मध्ये 😍🌿
#थालीपीठ #थालिपीठ #मटकी ゚viralシ

Address

Bangalore

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 12pm - 3pm

Telephone

+918861844211

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Home Chef Shree posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Home Chef Shree:

Share