Sfurti Foundation,pandharpur

Sfurti Foundation,pandharpur Our SFURTI FOUNDATION , PANDHARPUR Works For HUMAN RIGHTS , WOMEN RIGHTS , CHILD RIGHTS , HANDICAPPED RIGHTS & SENIOR CITIZEN RIGHTS In MAHARASHTRA .

13/01/2022
जागतिक महिला दिनानिमीत्त नूतन महिला न्यायाधीश व महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी सत्कार समारंभ .
15/03/2020

जागतिक महिला दिनानिमीत्त नूतन महिला न्यायाधीश व महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी सत्कार समारंभ .

करिअर मार्गदर्शन कार्यशाळा , पंढरपूर
26/12/2019

करिअर मार्गदर्शन कार्यशाळा , पंढरपूर

मानवाधिकार कार्यकर्ते मा.अ‍ॅडव्होकेट असिमजी सरोदे यांचे स्फुर्ती फाउंडेशन ,पंढरपूर आयोजीत मानवी हक्क ,महिला हक्कांसाठी म...
06/02/2016

मानवाधिकार कार्यकर्ते मा.अ‍ॅडव्होकेट असिमजी सरोदे यांचे स्फुर्ती फाउंडेशन ,पंढरपूर आयोजीत मानवी हक्क ,महिला हक्कांसाठी मार्गदर्शन पुढील महिन्यात पंढरपूर येथे आयोजित केले आहे . आवश्य लाभ घ्या .
यशवंत डोंबाळी
President

येत्या चार महिन्यात दुष्काळाचे भयंकर चटके ग्रामीण भागात जाणवणार आहेत . त्याच्या वेदना शेतकरयांनाच जास्त करून जाणवणार आहे...
07/01/2016

येत्या चार महिन्यात दुष्काळाचे भयंकर चटके ग्रामीण भागात जाणवणार आहेत . त्याच्या वेदना शेतकरयांनाच जास्त करून जाणवणार आहेत . यासाठी राज्य शासनाने दुष्काळग्रस्त गोरगरीब शेतकरयांना घरातील माणसांच्या व गोठ्यातील जनावरांच्या संख्येनुसार कमीतकमी वीस हजार ते पुढे जगण्यासाठी परिपोषण अनुदान दुष्काळ संपेपर्यंत त्यांचे खात्यावर जमा करावे . तसेच यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारयांनी किमान दोन महिन्यांचा थकित महागाई भत्त्याचा फरक शेतकरयांना परिपोषणासाठी द्यावा ही विनंती . त्याचप्रमाणे राज्याचे सर्व मंत्री व आमदार ,खासदार यांनी दुष्काळ संपेपर्यंत आपले वेतन शेतकरयांना जगण्यासाठी द्यावे ,ही नम्र विनंती . तसेच शहरातील सुस्थित जनतेने श्री . नाना पाटेकर व श्री . मकरंद अनासपुरे यांच्या " नाम फाउंडेशन " च्या माध्यमातुन दुष्काळग्रस्त गोरगरीब शेतकरयांना मदत करावी , ही विनंती .

सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधनगृहे मिळणे हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर महिल...
26/12/2015

सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधनगृहे मिळणे हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर महिलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा येईल , असे स्पष्ट मत मा. उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. महिलांनो आपल्या अधिकाराविषयी नेहमी जागरूक रहा . आपल्या प्रसाधनगृहाच्या गैरसोयीबाबत प्रशासनाकडे तक्रार करा .

उद्या 3 डिसेंबर , विश्व अपंग दिन . खरेतर हा आपला आत्मचिंतन दिन. कारण अपंग हा पण आपलाच पण आजही आपल्यापासुन दूर असलेला वंच...
02/12/2015

उद्या 3 डिसेंबर , विश्व अपंग दिन . खरेतर हा आपला आत्मचिंतन दिन. कारण अपंग हा पण आपलाच पण आजही आपल्यापासुन दूर असलेला वंचित समाजघटक . फक्त उद्यापुरता आपणांस दिसतो तो अपंग. आपण कधी जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यथा ? आज ग्रामीण भागात अनेक अपंग आहेत जे आजही भवितव्य या शब्दापासून कोसो दूर आहेत. पुढे शिकायची सोय नसल्याने फक्त वय वाढत आहे. कारण शासनाच्या योजना कागदोपत्रीच आहेत. आपण त्यांना उपजिवेकेचे साधनच उपलब्ध करून देण्यात कमी पडलो आहोत , त्यामुळे त्यांच्या जीवनातील पुढील विवाह ,कुटूंब हे टप्पे थांबलेले आहेत. मतिमंद आणि बहुविकलांग अपंगांना भवितव्य नाही. याचे उत्तर ना शासनाकडे आहे ना स्वंयसेवी संस्थांकडे आहे. स्वंयसेवी संस्थांना फक्त देणग्या देऊन अपंगांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते सोडवावे लागतील.

शिका कारण तो तुमचा अधिकारच आहे.
20/11/2015

शिका कारण तो तुमचा अधिकारच आहे.

नमस्कार आम्ही स्फूर्ती फाउंडेशन , पंढरपूरच्या वतीने पंढरपूर शहरातील जेष्ठ नागरिक नोंदणी अभियान सुरू केले आहे. आपण आपली म...
16/11/2015

नमस्कार आम्ही स्फूर्ती फाउंडेशन , पंढरपूरच्या वतीने पंढरपूर शहरातील जेष्ठ नागरिक नोंदणी अभियान सुरू केले आहे. आपण आपली माहिती आमच्या अधिकृत अर्जामध्ये भरावयाची व आपला सध्याचा एक फोटो अर्जावर चिटकावयाचा व दोन फोटो आपले नाव पाठीमागे लिहून द्यावयाचे आहेत . आपण फक्त 9860040411 या मोबाईल क्रमांकावर गृपने अर्जाची मागणी केल्यास आम्ही आपणांकडे अर्ज पोहोच करू व भरून झाल्यावर अर्ज घेऊन जाऊ.आम्ही फक्त तुमच्या सेवेसाठीच...

पंढरपूर शहरातील सर्व जेष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक यांना कळविणेत येते की स्फूर्ती फाउंडेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी क...
04/11/2015

पंढरपूर शहरातील सर्व जेष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक यांना कळविणेत येते की स्फूर्ती फाउंडेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक नोंदणी उपक्रम सुरू केलेला आहे. यामुळे आपणांस पोलीसांकडून सहकार्य व संरक्षण वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे. पोलीस तसेच आमचे पदाधिकारी आपली वेळोवेळी भेट घेऊन आपल्या अडचणी जाणून घेतील व कायम आपल्या संपर्कात राहतील. तसेच अडचणीच्या काळात मदतीसाठी आपणांस संपर्क क्रमांक देण्यात येईल. यासाठी आपण आपले नाव , पत्ता , वय , संपर्क क्रमांक व तीन फोटो श्री .गणेश इनामदार , जेष्ठ नागरिक विभाग प्रमुख , स्फूर्ती फाउंडेशन c/o हर्षल मेडीकल स्टोअर्स , मनिषानगर परिसर यांचेकडे सादर करावेत.अधिक माहितीसाठी संपर्क - 9860040411
(कृपया पंढरपूर शहरातील नागरिकांनी ही पोस्ट जास्तीतजास्त शेअर करावी , ही विनंती .)

पंढरपूर येथे SPHURTI FOUNDATION च्या बाल हक्क विभागाच्या वतीने पणती सजावट स्पर्धा शालेय मुलामुलींच्या व्यक्तीमत्व विकासा...
02/11/2015

पंढरपूर येथे SPHURTI FOUNDATION च्या बाल हक्क विभागाच्या वतीने पणती सजावट स्पर्धा
शालेय मुलामुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे .
शनिवार दि. 7 नोव्हेंबर रोजी कवठेकर प्रशाला , नाथ चौक ,पंढरपूर येथे दिवाळी निमीत्त " पणती सजावट स्पर्धा " दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजीत करण्यात आलेली आहे.
अ गट - इयत्ता 3 री ते 4 थी
ब गट - इयत्ता 5 वी ते 7 वी
क गट - इयत्ता 8 वी ते 10 वी
स्पर्धक मुलामुलींनी पणती व सजावटीचे साहित्य स्वत: आणावयाचे आहे.
विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र व वस्तुस्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे.

Address

Pandharpur

Telephone

9860040411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sfurti Foundation,pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sfurti Foundation,pandharpur:

Shortcuts

Share