24/04/2026
वसंतात निसर्ग अगदी आपले रंग मुक्तहस्ते उधळत असतो..
पांढऱ्या आणि आपली गुलाबीची वेगळीच छटा मिरवत झुलत असते ती ही मधुमालती..
एखाद्या बंगल्याच्या compound वर अगदी हमखास दिसणारी, इवल्याश्या नाजूक, इतक्या कोरीव एकसारख्या पाकळ्या की जणु माप घेऊनच कोरल्या असाव्या.., कधी मान वर तर कधी खाली झुकवून खूप दिवस तजेलदार राहून आनंद देणारी, आपला देखणा रंग दिवस जातील तसा बदलणारी अशी गोड मधु मालती..
मला तर ही फुलं आपल्याकडे बघून छान हसतायत असाच भास होतो !!
पटकन हात पुढे होतो आणि एखादं फूल तोडलं जातच.. मधुमालतीचे एक फूल हातात घेऊन मंद सुगंध घेऊन पटकन कानामागे अजुन सुद्धा अडकवलं जातं !
वसंत असेल आणि तुम्ही मला वॉक घेताना पाहिलत तर माझ्या हातात किंवा कानामागे मधुमालती अगदी हमखास डोकावताना दिसेल !
अशी माझी अगदी लाडाची मधुमालती आणि तिची साडी ते ही यंत्र कौमुदी मधे करताना खूपच आनंद होतोय !
नक्की सांगा कशी वाटली !!
यंत्र कौमुदी मधुमालती साडी…🪷
Madhumalti Embroidered Saree !!🪷
To order , kin