20/03/2023
🚩 "गुढीपाडवा तारका" 🟧
|| पारंपरिक साजात या नटून, अन पैठणी न्या लुटून ||
■ हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत महिला, युवतींसाठी अनोखी स्पर्धा
■ "5" गुढीपाडवा तारकांचा होणार पैठणी देऊन सन्मान
■ संकल्पना, आयोजक - कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ, रत्नागिरी
■ प्रायोजक - गणेश वस्त्र निकेतन, रत्नागिरी
"हिंदू नववर्ष स्वागत यात्रा 2023" मध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या "कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ" तर्फे "गुढीपाडवा तारका" ही महिला, युवतींसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या, विशेष साजशृंगार केलेल्या पाच महिला, युवतींना बक्षीस स्वरूपात खास पैठणी मिळणार आहे. पारितोषिक प्राप्त करण्यासाठी पारंपरिक साज लेऊन महिला किंवा युवतींनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सक्रिय सहभागी होणे क्रमप्राप्त आहे. विशेष आकर्षक, फोटोजनिक अशा 5 महिला/युवतींची निवड आमच्या परिक्षकांतर्फे करण्यात येईल. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या समारोपप्रसंगी या पाच "गुढीपाडवा तारकां"ना खास पैठणी देऊन गौरविण्यात येईल. रत्नागिरी बाजारपेठेतील प्रसिद्ध "गणेश वस्त्र निकेतन"चे संजीव जैन यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले आहे.
तर हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत महिला व युवतींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून अवश्य सहभागी व्हा. यंदा प्रथमच ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कोण ठरणार "गुढीपाडवा तारका" याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तर हिंदू नववर्षाचे स्वागत यात्रेत महिला व युवतींनी || पारंपरिक साजात या नटून, अन पैठणी न्या लुटून ||, असे आवाहन "कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ"चे संचालक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.
■ अधिक माहितीसाठी संपर्क :-
कांचन डिजिटल
8999332757, 9422576736